धाराशिव : अनेकजण व्यवसाय करत असताना अपयश आल्यावर खचुन जातात आणि दुसरा मार्ग निवडतात. मात्र, एका व्यक्तीने 4 वेळा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. मात्र, अडचणींमुळे तो बंद पडला. पण तरीही पुन्हा हॉटेलचा व्यवसाय सुरू करुन आता महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. जाणून घेऊयात, ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथील शिवाजी घुले यांनी 2000 साली हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर काही अडचणींमुळे एकूण 4 वेळा हॉटेलचा व्यवसाय बंद पडला. हॉटेलचा व्यवसाय सुरू झाला की अडचणीमुळे तो बंद पडायचा. त्यानंतर पुन्हा कोरोनानंतर त्यांनी हॉटेलचा व्यवसाय जोमाने सुरू केला. आज महिन्याला त्यांची 60 ते 70 हजार रुपयांची उलाढाल होत आहे.
शिवाजी घुले यांनी पारगाव येथील बसस्थानकाजवळ छोटेखानी हॉटेल थाटले आहे. सुरुवातीला त्यांनी केवळ चहा आणि नाश्त्याची सोय ठेवली होती. मात्र, आता विशेष करून त्यांची लस्सीही प्रसिद्ध झाली आहे. आता त्यांच्याकडे थंडगार मलाईदार लस्सी, लिंबू पाणी, फळांचा ज्यूस, चहा आणि नाश्त्याची सोय अशी व्यवस्था त्यांनी केली आहे.
15 महिन्यात एकरी कमावले 11 लाख रुपये, साताऱ्याच्या शेतकऱ्यानं कशाची शेती केली?, VIDEO
एकेकाळी सुरू केलेला हॉटेल व्यवसाय 4 वेळा बंद पडला. मात्र, तरीदेखील त्यांनी हार मानली नाही. पुन्हा तोच हॉटेलचा व्यवसाय त्याच ठिकाणी सुरू केला आणि आज महिन्यासाठी ते 60 ते 70 हजार रुपयांची ते उलाढाल करत आहेत.
सुतार व्यवसाय काळाच्या पडद्याआड?, आधुनिकतेचा बसतोय फटका, सोलापुरातील परिस्थितीचा VIDEO
एखादा व्यवसाय सुरू करायचा ठरवले की, तो जरी बंद पडला तरी तो पुन्हा सुरू करायला पाहिजे. हार न मानता तो पुन्हा सुरू केला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि व्यवसाय सुरू केला पाहिजे, असा सल्ला ते देतात. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.