धाराशिव : हिंदू धर्मामध्ये गाईला कामधेनू मानलं जातं. त्यामुळे गाईंची पूजा केली जाते. अलिकडे देशी गाईंच्या संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील मुस्लिम समाजातल्या अकबर कुशलदिन शेख यांनी गोशाळा सुरु केली आहे. त्यांची ही गोशाळा खरंतर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
कशी झाली गोशाळा सुरुवात?
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अनदुर हे अकबर कुशलदिन शेख यांचे गाव आहे. शेती करत असताना त्यांना गायीचा सहवासतला भाग समाजासाठी गाय किती महत्त्वाचे आहे हे समजले. गाय असल्यामुळे मिळणारे मानसिक समाधान त्यांनी जवळून अनुभवला आणि त्यातूनच त्यांनी देशी गाईंच्या संवर्धनासाठी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. खरंतर गाय कापणे आणि गाय सांभाळणे यातला फरक त्यांनी जवळून अनुभवला आणि त्यांनी भली मोठी गोशाळा उभारली.
advertisement
मुलगी शिकली, सशक्त झाली! सोलापुरात मुलींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे
आज अकबर यांच्याकडे 27 गाई आणि 39 म्हशी आहेत. ज्यामध्ये काही गाई आणि म्हशी या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या होत्या. ज्या गाई आणि म्हशीची पोलिसांनी सोडवून केली. त्या गाई आणि म्हशीचा अकबर हे संभाळ करतायत. तर त्यातील काही गाई त्यांनी कसायापासून सोडवून आणलेल्यात आहेत. मुस्लिम असूनही गोशाळा चालू करण्याच्या या त्यांच्या निर्णयाला काहीसा विरोध देखील झाला. परंतु मोठ्या धिराने त्यांनी याचा सामना केला. अकबर यांनी सुरू केलेल्या या गोशाळेत अनेक जनावर आहेत.
वाह सातारकर! गावं एकवटली, महिलांना रोजगार मिळाला; लय भारी उपक्रम
गाय कापणे आणि गाय सांभाळणे यातील फरक त्यांनी समजून घेतला. गोशाळा सुरू करून ते भाकड गाई आंधळ्या गाई म्हशी यांचा सांभाळ करतायत. खर तर अकबर यांनी सुरू केलेली ही गोशाळा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.