TRENDING:

Dharashiv Crime : 'मी कर्ज कसं फेडू...', 45 वर्षीय शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या दिवशी भावाला भेटला अन्...

Last Updated:

Dharashiv Crime News : धाराशिव तुळजापूर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अणदूरमधील 45 वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dharashiv Crime News (बालाजी निरफळ, प्रतिनिधी) : धाराशिव तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे असं या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळी जाऊन पंचनामामध्ये नोंद घेण्यात आली आहे. शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलण्याच्या आदल्या दिवशी भावाची भेट घेतली होती अन् मनातली खदखद सांगितली होती.
Dharashiv Crime 45 year old farmer ends life
Dharashiv Crime 45 year old farmer ends life
advertisement

हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला

आत्महत्या करणाऱ्या उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे. भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत त्याला एका खासगी व्यक्तीचं कर्ज सोडवायचं होतं. विहिरीसाठी आणि पाईप लाईनसाठी मयत शेतकऱ्याने कर्ज घेतलं होतं.

advertisement

घटनास्थळी पोहोचून पंचनामा

ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नळदुर्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुटुंबाला आर्थिक मदत करावी

advertisement

उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मुला-बाळांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर

advertisement

दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv Crime : 'मी कर्ज कसं फेडू...', 45 वर्षीय शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या दिवशी भावाला भेटला अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल