याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलघडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले. दरोड्याचा मास्टर माईंड धाराशिव शहरातील विजय चौक येथील रमेश बळीराम दीक्षित यासह 3 जणांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पोलिसांच्या वेगवेगळ्या 9 पथकांनी तपास करीत दीक्षित याच्यासह नवी मुंबई नेरुळ येथून प्रशांत शिंदे, उदयन वल्लीकालाईल या 3 जणांना अटक केली.
advertisement
crime : 17 वर्षांच्या मुलाच्या आईने हद्द केली पार, लेकाला लाज वाटली म्हणून तो नडला, पण...
दीक्षित याच्याकडून 1 किलो सोने जप्त केले असुन त्याची किंमत 50 लाख आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी व झटपट श्रीमंत होण्यासाठी दीक्षित याने हा मार्ग स्वीकारत दरोड्याची योजना आखली आणि गेली 6 महिन्यापासून प्लॅन करीत अनेकवेळा रेकी केली. दीक्षित हा सोनार असुन त्याचे सोन्याचे दुकान आहे, तो 3 वर्षांपूर्वी ज्योती क्रांती बँकेत कामाला होता मात्र त्याने नंतर ते काम सोडले. पोलिसांनी 10 दिवसात गुन्ह्याची उकल करीत आतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला.