धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरू होती. यावेळी अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज रोहित पवार, आदित्य ठाकरे, अमित देशमुख उपस्थित होते. खासदार ओमराजे निंबाळकर आज उमेदवारी अर्ज भरणार होते. यासाठी सभा आयोजीत करण्यात आली होती.
advertisement
उष्माघात कसा ओळखाल?
उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात.
वाचा - बारामतीत आणखी एक पवार मैदानात? रोहित पवारांच्या मातोश्रींनी घेतला उमेदवारी अर्ज
असा करा उकाड्यापासून बचाव
- उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी,
- दुपारी 12 ते सायं. 4 वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा
- पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, थेट येणारा सूर्यप्रकाश, ऊन टाळा.
- पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
- उन्हात चप्पल न घालता- अनवाणी चालू नये, चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत.
याठिकाणी उन्हाचा तडाख्यामुळे लोक त्रस्त
बुलढाणा - १२, सिंधुदुर्ग - ९, वर्धा - ८, नाशिक - ६, कोल्हापूर - ५, पुणे - ५, सोलापूर - ३, ठाणे - ३, धुळे - ३, अमरावती - ३, अहमदनगर - २, बीड - २, जळगाव - २, रायगड - २, परभणी - २, चंद्रपूर - २, नांदेड - १, नागपूर १, सातारा - १, रत्नागिरी - १, गोंदिया - १, अकोला - १, उस्मानाबाद - १, भंडारा - १