Baramati Lok Sabha : बारामतीत आणखी एक पवार मैदानात? रोहित पवारांच्या मातोश्रींनी घेतला उमेदवारी अर्ज

Last Updated:

Ajit Pawar And Sunanda Pawar : आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंद पवार यांनीही बारामती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

बारामतीत आणखी एक पवार मैदानात?
बारामतीत आणखी एक पवार मैदानात?
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. बारामतीत पहिल्यांदाच नणंदविरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. मात्र, आता रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आहे.
निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना मोठी तांत्रिक तयारी करावी लागते ती फॅार्म भरायची. अनेकदा बाहेर लोकप्रिय असलेले उमेदवार तांत्रिक कारणांमुळे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या रिंगणाबाहेर गेलेले आहेत. त्यामुळे कसलेले राजकारणी याबाबतची जोरदार तयारी करतात. सगळ्याच शक्यता लक्षात घेऊन अगदी डमी अर्ज भरतात. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना अजित पवार हे डमी असतील तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुनंदा राजेंद्र पवार या डमी उमेदवार असणार आहेत.
advertisement
बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई जोरात सुरूये. प्रचारमध्ये चढाओढ सुरू आहेच. मात्र आता फॅार्म भरायच्या प्रक्रियेत ही कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुनेत्रा पवार या 18 तारखेला अर्ज भरणार असून त्यांच्यासोबत अजित पवार यांचा ही अर्ज भरला जाणार आहे. हा राजकीय डाव लक्षात घेत लगेच सुनेत्रा पवार यांच्या जाऊबाई सुनंदा पवार यांनी ही अर्ज घेतलाय. सुप्रिया सुळेसाठी त्या डमी उमेदवार असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत डमी उमेदवार ही अखेरच्या क्षणी होणारी गडबड टाळण्यासाठी करण्यात येणारा पर्याय आहे. पण ऐनवेळी अजित पवारच उमेदवार राहिले तर?
advertisement
समजा सुनेत्रा पवारांचा अर्ज कुठल्याही तांत्रिक कारणाने बाद ठरला तर ऐनवेळचे उमेदवार म्हणून अजित पवारांचही नाव येऊ शकतं. तसच सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत ही शक्यता आहे. समजा सुप्रिया सुळे यांचा अर्ज बाद झाला तर सुनंदा पवार या ऐनवएळच्या उमेदवार असतील. डमी अर्ज भरण हे नवीन नसल्याच छगन भुजबळ म्हणताहेत. अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारी घेणेयाचेया शेवटच्या तारखेच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक रंजक घडामेडी घडत असतात. ऐनवळेला अशी काही गंमत बारामती लोकसभेत होते का हे पाहण गमतीशीर असणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Baramati Lok Sabha : बारामतीत आणखी एक पवार मैदानात? रोहित पवारांच्या मातोश्रींनी घेतला उमेदवारी अर्ज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement