Maharashtra politics : उमेदवारी जाहीर होताच उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर; शरद पवारांना केलं खुलं चॅलेंज
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
साताऱ्यामधून भाजपच्या वतीनं उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सातारा, सचिन जाधव, प्रतिनिधी : महायुतीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता, अखेर हा तिढा सुटला आहे. साताऱ्यामधून भाजपच्या वतीनं उदयनराजे भोसले यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर उदयनराजे यांंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे?
शरद पवार यांनी साताऱ्यातून ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारावर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते का बोलले नाहीत असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांनी आम्हाला नौतिकता सांगू नये असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की शशिकांत शिंदे यांनी म्हटलं होतं की भ्रष्टाचाराचे आरोप जर झाले तर मी फॉर्म भरणार नाही. परंतु त्यांनी आता फॉर्म भरलेलाच आहे. त्यामुळे त्यांनी आता नैतिकता दाखवत फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर फॉर्म काढून घ्यावा. जर माझ्यावर झालेला एखादा जरी भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही, आणि फॉर्म भरल्यानंतरही जर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर मी फॉर्म मागे घेण्याच्या तारखेपर्यंत माझा फॉर्म मागे घेईल असं खुलं चॅलेंज उदयनराजे यांनी शरद पवार यांना दिलं आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
April 16, 2024 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Maharashtra politics : उमेदवारी जाहीर होताच उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर; शरद पवारांना केलं खुलं चॅलेंज