आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
शिवसेना नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना 10 कोटींचा चेक दिला होता, असा मोठा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे मला आरोग्य मंत्री ऐवजी अयोग्य मंत्री म्हणत असतील तर तुम्ही 2019 ते 2022 या काळातील मुख्यमंत्री नसुन मूर्ख मंत्री आहात. आम्ही आमदार म्हणून तुमची मूर्खमंत्री म्हणून नेमणूक केली, ती आमची चुक अशी घणाघाती टीका केली दरम्यान उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौऱ्यात भुम येथील सभेत आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्यावर अयोग्यमंत्री म्हणून टीका केली होती त्याला सावंत यांनी उत्तर दिले आहे.
advertisement
ठाकरेंची टीका जिव्हारी
धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोनदिवसीय संवाद सभेच्या निमित्ताने ठाकरे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. मागच्या वेळी वाघाऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली, याबद्दल सर्वांची माफी, आता यापुढे खेकड्याला पुन्हा येऊ देणार नाही, असे म्हणत ठाकरेंनी खरमरीत टीका केली. या मतदारसंघात अस्सल वाघालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा - काल ठाकरेंना पुष्पगुच्छ दिली, आज जय महाराष्ट्र केलं; एकनाथ शिंदेंच्या गळाला 'मोठा मासा' लागला
धरणफुटीची जबाबदारी खेकड्यावर झटकणारा काय कामाचा? मात्र, अशा माणसाला आपण उमेदवारी देऊन चूक केली. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. कर्माने मरणाऱ्या माणसाला धर्माने मारण्याची गरज नाही. खेकड्याला मस्ती आहे. या खेकड्याला पुन्हा इकडे येऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.