धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गणेश रामलिंग गरड यांची ही कहाणी आहे. त्यांनी 2009 मध्ये कॅरम विक्रीचा व्यवसाय सोडून स्टेशनरी व्यवसायाला सुरुवात केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या होती. पण हाती भांडवल नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी कमीत कमी भांडवलात स्टेशनरी व्यवसाय सुरू करता येऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जेमतेम चार हजार रुपये जमवले आणि स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
सुरुवातीला त्यांनी पुण्यावरून 4 हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले आणि पहिल्या दिवशी त्यांनी आठवडी बाजारात दुकान सुरू केले. त्यात त्यांना केवळ 250 रुपयांचा धंदा झाला. त्यानंतर त्यांनी आठवड्यातील 6 दिवस आठवडी बाजारात दुकान लावण्यास सुरुवात केली. आता सध्या त्यांना या व्यवसायातून दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुपयांची उलाढाल होत आहे.
दादरमध्ये याठिकाणी मिळतं अगदी घरगुती जेवण, शुद्ध तुपातले मोदक अन् पुरणपोळीची चवही चाखता येणार!
हर एक माल दहा रुपयांना ते विक्री करतात. त्यामध्ये सुई पासून झाडांची कुंडी, संसार उपयोगी साहित्य, अंड्याची घासणी चमचा, इलेक्ट्रिक टेस्टर, अनेक प्लास्टिक आणि स्टीलच्या वस्तू ते 10 रुपयांना विकतात. त्यामुळे त्यांच्या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्यातून त्यांची दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुपयांची उलाढाल होत आहे, असे गणेश गरड यांनी सांगितले. अशाप्रकारे ते आज महिन्याला 75 हजार रुपयांची उलाढाल करत आहेत.
तब्बल 30 वर्षांची परंपरा, पुण्यातील याठिकाणी मिळते इलायची, केसरयुक्त खरवस, दरही सुलभ
आठवड्यातील एकूण 6 दिवस आठवडे बाजारात हर एक माल 10 रुपये हे आपले दुकान लावतात. आपल्या या व्यवसायातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते, असे त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.