याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरातील कमावत्या व्यक्तींनीच आत्महत्या केल्याने कुटुंबाची जबाबदारी अवघ्या नऊ वर्षाच्या ईश्वरीवर येऊन पडली आहे. वृद्ध आजोबा व दोन छोट्या भावंडांचा सांभाळ करण्याची वेळ ईश्वरी वर आलीय. सागर सुतार यांच्या कुटुंबात पत्नी अर्धांग वायूने आजारी तर वडील ही अंथरुणाला धरून असायचे. त्यातच कर्जबाजारीपणा वाढत चालल्याने सागर सुतार व आई सुमन सुतार हे मायलेक दवाखान्यात जातो म्हणून गेले. त्यानंतर तुळजापुरात जाऊन त्यांनी आत्महत्या केली.
advertisement
Beed News : काळ जवळ येत होता पण अंध वयोवृद्धाला दिसला नाही; बीडमध्ये हृदयद्रावक घटनेत मृत्यू
पंधरा दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सुतार कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. अर्धांगवायूने आजारी असलेल्या आईसह घराची जबाबदारी नऊ वर्षाच्या ईश्वरीवर येऊन पडलीय. मायलेकांच्या आत्महत्येनंतर आता घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील काही लोकांनी कुटुंबांनी मदत करत तातडीची जगण्याची गरज भागवली. मात्र भविष्यात संकटाचा सामना ९ वर्षाच्या मुलीला करायचा आहे.