Beed News : काळ जवळ येत होता पण अंध वयोवृद्धाला दिसला नाही; बीडमध्ये हृदयद्रावक घटनेत मृत्यू
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Beed News : आजारी असलेल्या अंध वयोवृध्द व्यक्तीचा पत्र्याच्या झोपडीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.
बीड, 26 डिसेंबर (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : पत्र्याच्या शेडच्या झोपडीला अचानक लागलेल्या आगीत 65 वर्षीय अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या आलापूर येथे घडली. रामभाऊ उत्तमराव शहाणे (वय 65)असे मयत वृद्धाचे नाव आहे. नेमकी आग कशाला लागले याचा शोध पोलीस घेत आहेत.
आलापूर गावात रुक्मीनबाई व रामभाऊ शहाणे हे दाम्पत्य एका पत्र्याच्या झोपडीमध्ये राहतात. रुक्मिणीबाई सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या. तर अंध असलेले रामभाऊ आजारी असल्याने घरीच होते. दरम्यान, दुपारी अचानक पत्र्याच्या शेडच पुढील भाग पेटला. धुराचे लोट पाहून गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत रामभाऊ शहाणे यांचा धूराने दम कोंडून आणि आगीत होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
स्मशानभूमीसाठी आंदोलन
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी अभावी प्रेत शासनाच्या दारी आंदोलन केलं आहे. जिल्ह्यातील 1394 पैकी 656 गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पावसाळ्यात या घटना सर्वाधिक समोर येतात. त्यात वादविवाद होऊन मृतदेहाचे हेळसांड होते. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून स्मशानभूमी बांधल्या जाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी स्वतःचं प्रेत प्रतिकात्मक स्वरूपात शासनाच्या कार्यालयाबाहेर ठेवले होते. या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा देखील होतंय. लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 9:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News : काळ जवळ येत होता पण अंध वयोवृद्धाला दिसला नाही; बीडमध्ये हृदयद्रावक घटनेत मृत्यू