लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण एकट्या मराठा समाजाचे मुख्यमंत्री नसून 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेत 60 टक्के ओबीसी समाज आपला हिसका दाखवून देईल असा हल्लाबोल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. जरांगे ना एक आणि ओबीसी समाजाला एक अशा दोन भूमिका मुख्यमंत्री मानत आहेत. तसेच शरद पवार यांनी देखील ओबीसीची जाहीरपणे भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी हाके यांनी केली आहे.
advertisement
वाचा - मालवण येथे महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे कधीच ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाही. राज्याचे आरोग्य मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत तर मनोज जरांगे यांच्या स्टेजवर कार्यकर्ता म्हणून जातात. तुम्हाला जायचंय तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन जा, अशा शब्दात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी शरद पवार ओमराजे निंबाळकर आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आज भूम शहरात ओबीसी आरक्षण यात्रा निघाली होती. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.