धाराशिव : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक संतापाची लाट असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नेमका काय आहे हा उपक्रम, जाणून घेऊयात.
मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना आळा बसण्यासाठी उमरगा पोलिसांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पोलीस काका आणि पोलीस दीदी असे या उपक्रमाचे नाव आहे. यामध्ये तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली.
advertisement
धाराशिव जिल्ह्यात पोलीस दीदी व पोलीस काका हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय या ठिकाणी पोलीस दीदी व पोलीस काका हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उमरगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळा महाविद्यालये यांच्या प्रवेशद्वारावर पोलीस दीदी आणि पोलीस काका यांचे मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक यांचा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
ST च्या ताफ्यात येणार 5 हजार नवीन बस, पैकी 1310 असणार भाडेतत्त्वावर, कशी असेल नेमकी प्रक्रिया
तसेच याबाबतचे पोस्टरही लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्यांनाही तक्रार करायची आहे, त्यांनी पोलीस काका आणि पोलीस दीदीला तक्रार करावी, तक्रार देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली आहे.
महिनाभरात तयार होतात 5 हजार मोदक, ठाण्यातील महिलेमुळे अनेकांना मिळाला रोजगार, VIDEO
हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये याठिकाणी पोलीस दीदी आणि पोलीस काका यांचा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना रोडरोमिओंचा त्रास होत असेल, असे विद्यार्थी, विद्यार्थिनी पोलीस काका किंवा पोलीस दीदीला संपर्क साधून तक्रार करू शकता.