TRENDING:

2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य, नेमकं काय करावं लागणार?

Last Updated:

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी पीक फेऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद असणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पिकांचा शेती उत्पादनात मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्यकारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले.

त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावण्यात आल्या आहेत.

advertisement

घरची परिस्थिती हालाखीची, पण तरुणाने करुन दाखवलं, कंपनीमध्ये काम करून बनला पोलीस!

त्याचबरोबर शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेले संमती पत्र भरून देणे अपेक्षित आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी आधार अधिनियम 2016 नुसार आपल्या आधार नंबरचा वापर ओळख पटवण्यासाठी आवश्यक असून या संमती पत्रामध्ये आपले आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे.

advertisement

खिल्लार गायींच्या गोमुत्रातून लाखोंची उलाढाल, सोलापुरातील भाऊ-बहिणीची कमाल!

चूक होऊ नये यासाठी यासंबंधी पत्राबरोबरच आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहायकांना दिली तर अचूक आधार क्रमांक पोर्टलवर टाकता येणार आहे. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहे, त्यापैकी एकाच खातेदाराच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार असल्याने इतर खातेदारांची ना हरकत पत्र त्यासोबत जोडणेदेखील अपेक्षित आहे.

advertisement

दरम्यान, अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य, नेमकं काय करावं लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल