तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर घोटाळ्याप्रकरणी 2002 मध्ये सीआयडीने तपास केला होता. त्यानंतर सीआयडीने कारखान्याच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल लागला असून, तेरणा कारखान्याचे तत्कालीन संबंधित पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
ह्या लोकांची निर्दोष मुक्तता
सुनावणी दरम्यान पवनराजे यांचा मृत्यू झाला. डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील, पवनराजे निंबाळकर, रामेश्वर कारवा, शिवदास होनमाने, तानाजी शेंडगे, विवेक कुलकर्णी, राधेश्याम सोमाणी, मुकेश ओसवाल, ललित ओसवाल, अशोक शिनगारे, पवनकुमार झा उर्फ शर्मा, राजीव पाठक, मुकुंद पाठक, प्रमोद दिवेकर,मंगल बाळासाहेब पाटील, अब्दुल रशीद काझी यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणात ॲड विजयकुमार शिंदे, पंडीत नळेगावकर, विश्वजीत शिंदे, निलेश बारखेडे, विष्णु डोके सुग्रीव नेरे, मडके व गोसावी यांनी काम पाहिले.
advertisement
वाचा - 'वडापाव पाहिला की सरकारची आठवण येते, कोण वडा अन् कोण पाव?' राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी
काय होते प्रकरण ?
तेरणा साखर कारखान्याने 2001 मध्ये साखर विक्रीची जाहिरात दिली होती. त्यात मुंबई येथील रिगल इनपेक्स यांच्या निविदेला संचालक मंडळाने मान्यता दिली. त्यानंतर मात्र कोलकत्ता येथील साखर व्यापाऱ्यांना फ्रीसेलची साखर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. निवेदेनुसार साखर विक्री न करता चुकीच्या पद्धतीने साखर विक्रीतून संबंधितांनी 48 लाखांचा फायदाच करून घेतला, तर कारखान्याला सुमारे 95 लाखांचा तोटा झाला होता. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.