Raj Thackeray : 'वडापाव पाहिला की सरकारची आठवण येते, कोण वडा अन् कोण पाव?' राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी

Last Updated:

Raj Thackeray : गोरेगावातील वडापाव महोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली.

राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी
राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी
मुंबई, 2 डिसेंबर (ऋचा कानोलकर, प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वडापाव महोत्सव कार्यक्रमाला भेट दिली. गोरेगावात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे राजकारणावर टिप्पणी केली. हा वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला वडापावची उपमा दिली.
राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही. पुढे ते म्हणाले, प्रसाद ओक त्यांची टीम सर्वांचं स्वागत. आमच्या संदीप सावंतनं हा महोत्सव आयोजित केला. मला वाटलं फक्त महोत्सव आहे पण इथं प्रमोशन आहे. कलाकार गंमतशीर असतात, स्वतः डायट करतात आणि चित्रपटाची नावं पाहा, वडापाव, लंडनची मिसळ, जिलेबी.. तुम्ही खाताय आणि वजनं वाढतंय, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
advertisement
हाच वडापाव खाऊन अनेक पिढ्या घडल्यात - राज ठाकरे
मी किर्ती महाविद्यालय, शिवाजी पार्क इथला वडापाव खाऊन मोठा झालोय. अशा अनेक पिढ्या या वडापाव घडवल्या आहेत. त्यामुळे हा वडापाव फार जिव्हाळ्याचा विषय आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान यावेळी राज ठाकरेंनी सचिनचा अनुभव देखील सांगितला. आचरेकर सर सचिनच्या स्टम्पवर 1 रुपया ठेवयचे आणि सांगायचे हा रुपया पडला नाही तर तो तुझा. त्यावेळी 1 रुपयात वडापाव यायचा. तो वडापाव खाण्यासाठी सचिन दिवसभर तो स्टम्प पडू द्यायचा नाही. वडापाव ही संकल्पना अशोक वैद्य आणली. त्यामुळे अशा माणसांना महाराष्ट्र भूषण द्यायला हवा, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
advertisement
लंडनला वडापाव कसा सुरू झाला?
यावेळी राज ठाकरे यांनी दहा वर्षापूर्वी लंडनमध्ये सुरु झालेल्या एका वडापावची गोष्ट देखील सांगितली. दहा वर्षांपूर्वी दोन मराठी मुलं मला भेटायला आली होती. त्यांनी मला म्हटलं की आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं होतं, त्यांना भेटलो. आता तुम्हाला भेटायला आलो आहोत. संध्याकाळच्या फ्लाईटने आम्हाला लंडनाला जायचं आहे. मी त्यांना विचारलं तिथे जाऊन काय करणार. त्यांनी मला सांगितलं आम्ही तिथे जाऊन वडापाव सुरु करणार आहोत. त्यानंतर मी तिथे भेट दिली. तिथे गोऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होती, वडापाव खाण्यासाठी. खरंतर त्यांना तिखट जास्त मानवत नाही, तरीही त्यांना अशोक वैद्य यांनी सुरू केलेला वडापाव आवडला, हे विशेष, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
मराठी बातम्या/मुंबई/
Raj Thackeray : 'वडापाव पाहिला की सरकारची आठवण येते, कोण वडा अन् कोण पाव?' राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement