Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवरून कोकणकरांचा प्रवास होणार सुसाट, केव्हापासून होणार महामार्गाला सुरूवात?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
दरवर्षी कोकणवासीय मुंबई- गोवा महामार्गावरून शिमगा आणि गणेशोत्सव सणांसाठी कोकणात जात असतात. वाहतुक कोंडीमुळे तासनतास लागणारा वेळ आता लागणार नाही. कारण लवकरच या महामार्गाचे काम संपवले जाणार आहे.
कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गाचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. कोकणकरांचा शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन्हीही सण दरवर्षी ट्रॅफिकमध्ये, खड्ड्यांमध्ये आणि कोकण रेल्वेच्या गर्दीमध्येच अनेकदा जात असतात. पण आता ही कटकट कोकणवासीयांची अखेर जाणार आहे. पावसाळ्यामध्ये आणि सुट्ट्यांच्या दिवसामध्ये मुंबई- गोवा महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागायचे, पण आता ही सर्वात मोठा अडथळा दूर होणार आहे. मुंबई- गोवा महामार्गावर काही उर्वरित ठिकाणाचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले असून पावसाळ्याच्या आधी महामार्ग सुरू करण्याचा निर्णय आहे.
कोकणवासीयांना शिमगा, गणेशोत्सव आणि इतरत्र सुट्टीच्या दिवसांत कोकणात जात असताना ट्रॅफिकचा सामना करावा लागायचा. पण आता हा सामना करावा लागणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गावरील रखडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणच्या बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून 1 जूनपर्यंत हे दोन्हीही बायपास वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला इतकी दिरंगाई का?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर ही दोन शहरं वाहतूक कोंडीसाठी ओळखली जातात, मात्र आता या बायपासमुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून कायमची सुटका होणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या विद्युत पोलमुळे बायपासच्या कामांमध्ये अडथळे येत होते. आता ते अखेर सर्व अडथळे दूर करत लवकरच बायपासचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोकण रेल्वेच्या कामामध्ये येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी कायदेशीर पूर्तता करण्याचा निर्णय खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत घेतला आहे. यानंतर कोकणवासीयांचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे. बैठकीमध्ये नियोजन झाल्याप्रमाणे सर्व काही कामे पूर्ण झाल्यास मुंबई- गोवा महामार्ग 1 जूनपासून सुरू होणार आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवरून कोकणकरांचा प्रवास होणार सुसाट, केव्हापासून होणार महामार्गाला सुरूवात?







