धाराशिव : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायला गेल्यावर आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफाईड, जंतूंची वाढ यासारखे आजार होतात. अनेकांना याबाबत माहिती नसेल. पण दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराने तुम्हाला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे याबाबत नेमकी काय काळजी घ्यावी, यावर डॉ. शिवशंकर शिवगुंडे यांनी माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. दूषित पाणी पिल्यानंतर एक ते दोन दिवसात जुलाब सुरू होतो. पोटात दुखायला लागते. कळा येतात. 3 ते 4 दिवसांनी प्रकर्षाने ताप येऊ शकतो. टायफाईड हा देखील दूषित पाण्यामुळे होतो.
Solapur Success Story : 3 हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्यवसाय सुरू, आता 5 लाखांची उलाढाल
दूषित पाण्यामुळे 5 ते 6 प्रकारचे आजार होतात. त्यात उलटी, जुलाब, पोटाचे विकार, कावीळ हे आजार पसरतात. यावर नेमके काय उपचार करावेत याबाबतही त्यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध पाणी करून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
Satara News : 700 वर्षांच्या भंडाऱ्याची परंपरा, 2 हजार महिला करतात 25 क्विंटलच्या पुरणपोळ्या, VIDEO
पाणी उकळून प्यावे. मेडिकलवर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गार हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळते. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाणे टाळावे. पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. दूषित पाणी पिऊ नये, नारळाचं पाणी प्यावे आणि विशेष काळजी घ्यावी, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला.