या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. अलंकाराची मोजदाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी कार्यवाही करण्यासाठी कायदेशीर समिती नेमली होती, त्या समितीने दिलेला अहवालात तुळजाभवानी देवीचे अनेक पुरातन अलंकार सोन्या-चांदीचे दागिने हे गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. त्यात हे दागिने व अलंकार ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने महंत सेवेकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होणार आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून तुळजाभवानी मंदिरातील सोने चांदीची मोजदाद गहाळ वस्तू व त्यात अहवाल या सगळ्या गोष्टीमुळे तुळजाभवानी मंदिर व मंदिर प्रशासनाचा कारभार राज्यभर चर्चेला गेला होता आता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं ती चर्चा पूर्णत्वास जाईल व तात्काळ गुन्हे दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
वाचा - 'भविष्यात काय होईल माहिती नाही, पण...'डोळ्यात पाणी आणणारी पंकजा मुंडेंची बाबांसाठी कविता
तुळजाभवानी देवीच्या सोने चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला हायकोर्टाची स्थगिती
तुळजाभवानी देवीच्या सोने-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. देवीच्या 207 किलो सोने व 2570 किलो चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीश खंडपीठाने समिती दिली आहे. विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदिर संस्थांना सोने चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, त्या सोने चांदी वितळवण्याला पुजारी व हिंदू जनजागरण समितीने विरोध केला होता. यासंदर्भात प्रशासनाने यांचा विरोध मोडीत काढत ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवली होती. त्यानंतर आता पुजारी व हिंदू जनजागरण समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने हा निकाल दिला असून धाराशिव प्रशासनाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल तेरा वर्षानंतर तुळजाभवानीच्या मंदिरात सोने-चांदी वितळण्याची प्रक्रिया होणार होती. मात्र, ती आता न्यायालयाच्या कचाट्यात सापडली असून पुढील तारीख नऊ जानेवारी ठेवण्यात आली असून त्या तारखेलाच मंदिरातील सोने-चांदी वितळवणार स्थगिती कायम ठेवणार हे स्पष्ट होणार आहे.