थेट गाभाऱ्यातून दर्शन सुरू
आता देवीच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण झाल्यामुळे मंदिर संस्थानाने पुन्हा थेट गाभाऱ्यातून दर्शन सुरू केले आहे. त्यामुळे देवीचे जवळून डोळे भरून दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आता मंदिर उघडण्याची वेळ पहाटे चार वाजता करण्यात आली आहे. तर नित्य पुजेता घाट सकाळी सहा वाजता देण्यात येईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
advertisement
पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा 11 जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
लेखी अहवाल मिळालाच नाही
दरम्यान, तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहावरील कर्णशिळांना तडे गेल्याच्या मुद्द्यावरून मंदिराचा कळस उतरवण्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांमधील मतभिन्नता समोर आली आहेत. या प्रकरणात अधिकृत लेखी अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाला मिळालेला नाही. यामुळे मंदिराचा कळस उतरवणार की नाही, या निर्णयावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.