यासंदर्भात प्रशासनाने यांचा विरोध मोडीत काढत ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवली होती. त्यानंतर आता पुजारी व हिंदू जनजागरण समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने हा निकाल दिला असून धाराशिव प्रशासनाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल तेरा वर्षानंतर तुळजाभवानीच्या मंदिरात सोने-चांदी वितळवण्याची प्रक्रिया होणार होती. मात्र, ती आता न्यायालयाच्या कचाट्यात सापडली असून पुढील तारीख नऊ जानेवारी ठेवण्यात आली असून त्या तारखेलाच मंदिरातील सोने-चांदी वितळवणार स्थगिती कायम ठेवणार हे स्पष्ट होणार आहे.
advertisement
सोने चांदी वितळवण्यास सरकारची अध्यादेश काढून परवानगी
भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. 1 जानेवारी 2009 ते 10 जून 2023 या दरम्यान जमा झालेल्या सोने चांदी वितळवण्यास सरकारने अध्यादेश काढून परवानगी दिली होती. कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली असून सुनावणी आता 9 जानेवारी 2024 ला होणार आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूची नोंद ही सोने सदृश्य असल्याने कोर्टाने नियमावली व प्रक्रिया सादर करीत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
200 किलो सोनं आणि सुमारे साडे चार हजार चांदीच्या दागिने वितळवणार होते
गेल्या 10 वर्षांमध्ये तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी वाहण्यात आली. यात 200 किलो सोनं आणि सुमारे साडे चार हजार चांदीच्या दागिन्यांना आता वितळवलं जाणार होतं. हे सोनं-चांदी वितळवून त्याचे मोठे ब्लॉक केले जातील. वितळवण्यात आलेल्या सोन्यांचे ब्लॉक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवले जातील, ज्यातून मंदिराला भविष्यात उत्पन्न मिळणार आहे. शिवाय मंदिर संस्थानवर असलेली ही सोनं आणि चांदीच्या सुरक्षेची जबाबदारी कमी होईल. हे सोनं वितळवल्यानंतर 50 ते 60 टक्के प्युअर सोनं मिळेल असा अंदाज आहे. सोनं चांदी वितळवण्याची पारदर्शक पद्धत अभ्यासण्यासाठी तुळजाभवानी मंदिराचे पदाधिकारी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार आहे.