गेल्या काही दिवसांपासून विविध दावेदारांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी सर्वच विरोधी उमेदवारांनी माघार घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अर्ज माघारी घेण्याची वेळ संपताच डॉ. अनुजा यांच्या समर्थकांनी जल्लोषाचा साजरा करण्यात सुरुवात केली. अनुजा यांच्यावर असलेला लोकांचा विश्वास योग्य उमेदवाराची अचूक निवड या तिन्ही गोष्टींमुळेच प्रभाग 3 मध्ये विरोधकांना ‘चितपट’ व्हावे लागले असण्याची चर्चा तुळजापूर शहरात रंगू लागली आहे.
advertisement
राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
या बिनविरोध निवडीने आगामी नगराध्यक्ष आणि नगरपरिषद निवडणुकांवर मोठा परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून विरोधकांच्या गोटात या खेळीने अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, तुळजापूर मध्ये आता खरी निवडणूक रंगणार हे मात्र निश्चित झालं आहे.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर
माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यावेळी
विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता देखील भाजपने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात जाऊन सध्या जामिनावर बाहेर असलेल्या गंगणे यांचा राजकीय प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे.
