TRENDING:

Uddhav Thackeray : 'मोदी का परिवार'वरुन उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका, म्हणाले कुटुंब असेल तर..

Last Updated:

Uddhav Thackeray : धाराशिव येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी का परिवार या घोषणेची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव : भाजपकडून मोदी का परीवार अशी घोषणा दिली जात आहे. मेरा इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची जबाबदारी कोण घेणार? असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत संबोधन करताना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. मोदी यांचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही म्हणून माझे वडील चोरल्याचं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
advertisement

या परिवाराची जबाबदारी कोण घेणार?

उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना माझं कुटुंबं माझी जबाबदारी अशी घोषणा दिली होती. आता यांनी मोदी का परीवार सुरू केलं आहे. तुमचं परीवार ठीक आहे, पण या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. मी मुख्यमंत्री नाही हे मला माहित आहे. पण काही गद्दार म्हणतात हे अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. ओमराजे आणि कैलास यांचे कौतुक. कारण त्यांना देखील लालच दाखविण्याचा प्रयत्न झाला होता, हे खरे शिवसैनिक आहेत. आमदार खासदार नेले म्हणजे शिवसेना संपणार नाही. शिवसेना भाजपला संपवून मुठमाती करेल.

advertisement

स्वतःच्या बापाचा फोटो वापरा : ठाकरे

अमित शहा मणिपूरला जात नाहीत तिकडे शेपुट घालतात आणि इथे मोठ बोलतात. भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा आणि भाजप पक्ष वाढावा हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो, स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून राजकरण करून दाखवा, आमच्या वडिलांचे फोटो का लावता? अशी टीका ठाकरेंनी केली. ठाकरे पुढे म्हणाले, की काँग्रेसने फक्त 600 कोटी जमवले सत्तेत असताना. पण भाजपने काही वर्षातच सात आठ हजार कोटी जमवले. मग लुटले कोणी? जाहिरातीसाठी 84 कोटी खर्च केले आणि काय बघायचे तर त्यांचे दाढीवाले फोटो? आम्ही कामे केली पण जाहिराती केल्या नाहीत.

advertisement

वाचा - कोल्हापुरात वारं कुणीकडे? तयारी करूनही संभाजीराजेंनी का घेतली माघार? SPECIAL REPORT

औसा मतदार संघात त्यांचा उमेदवार पाडायचा : ठाकरे

राजनाथ सिंग स्वतःचे संरक्षण कसे बसे करतील त्याना टिकिट मिळाले तर, नितीन गडकरी यांचे टिकिट कापले. गर्वाचे घर खाली केलेच पाहिजे. मात्र, आम्ही मोदींचे आहोत हा गर्व कोण करत असेल तर त्यांनी त्यांचे बघावे. आता औसा मतदार संघात त्यांचा उमेदवार पाडायचा. कारण गेल्यावेळी फडणवीस यांनी विनंती केली म्हणून औसा जागा सोडली होती. पण आता नाही. नमो महारोजगार मेळावा म्हणजे ज्यानी भ्रष्टाचार केलाय त्यांना कामाला लावणे, कितीही घ्या कितीही खावा तुम्हाला काहीच नाही होणार ही मोदींची गॅरंटी, या गॅरंटीला मातीत पुरुन टाकायचं आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Uddhav Thackeray : 'मोदी का परिवार'वरुन उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका, म्हणाले कुटुंब असेल तर..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल