Lok Sabha Election : कोल्हापुरात वारं कुणीकडे? तयारी करूनही संभाजीराजेंनी का घेतली माघार? SPECIAL REPORT

Last Updated:

कोल्हापुरात निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार म्हणून कोणाचेही नाव पूढे आलेले नाही. या निमित्तानं राजकारण मात्र चांगलंच तापलं आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर : कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती इच्छुक होते. त्यादृष्टीने संभाजीराजे यांनी तयारीसुद्धा केली होती. मात्र अचानक शाहू महाराजांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबही केलं आहे. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं.
शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार म्हणून उतरवले जात आहे. त्यामुळेच युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. करवीरचे छत्रपती आणि आमचे वडील शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्यांना निवडून आणणे आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आता माझ्या उमेदवारीचा प्रश्नच येत नाही अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली.
advertisement
इतकंच नाही तर शाहू महाराज यांच्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संभाजीराजे यांनी चांगलेच खडसावले आहे. शाहू महाराज यांचे वय विचारता तर मोदींचे वय किती आहे? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला. तर महाराजांना नुसते आदर्श म्हणू नका तसे असेल तर निवडणूक बिनविरोध करा असे म्हणत हसन मुश्रीफ यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना सतेज पाटील यांनी चांगलंच फटकारलं आहे.
advertisement
संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. संभाजीराजे यांनी लोकसभेची प्रचंड तयारी केली होती, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज झाले असतील. मोदींची कार्यक्षमता संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे कुणीच कुणाच्या वयाबद्दल बोलू नये असं प्रत्युत्तर धनंजय महाडिक यांनी संभाजीराजे यांना दिलं आहे. निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार म्हणून कोणाचेही नाव पूढे आलेले नाही. या निमित्तानं राजकारण मात्र चांगलंच तापलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Lok Sabha Election : कोल्हापुरात वारं कुणीकडे? तयारी करूनही संभाजीराजेंनी का घेतली माघार? SPECIAL REPORT
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement