NCP : लक्षात ठेवा! मला शरद पवार म्हणतात; अजितदादांच्या आमदाराला नाव घेऊन सुनावले
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी आमदार सुनील शेळके यांच्याकडून दमदाटी केली गेल्याच्या चर्चा आहेत. यावरून शरद पवार यांनी थेट इशारा दिला आहे.
लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा लोणावळ्यात सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा सुरू असून त्यांनी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला. मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी आमदार सुनील शेळके यांच्याकडून दमदाटी केली गेल्याच्या चर्चा आहेत. याच चर्चांवर शरद पवार यांनी आमदार शेळकेंना इशारा देत म्हटलं की, मलाही शरद पवार म्हणतात.
शरद पवार यांनी म्हटलं की, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे येताय म्हणून तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांना सांगेन की सुनील शेळके, तुम्ही आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलेलं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढे असं काही केलंत तर मला शरद पवार म्हणतात. विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, गेलो तर कोणाला सोडत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी मेळाव्यातून थेट आमदार सुनील शेळके यांना सुनावलं.
advertisement
अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेलासुद्धा शरद पवार यांनी उत्तर देत हल्लाबोल केला. पवार म्हणाले की, देशाचे गृहमंत्री राज्यात आले होते. मुंबईत ते म्हणाले पन्नास वर्षे शरद पवार बसलेत. मी त्यांचा आभारी आहे. जनतेने पन्नास वर्षे माझ्यावर विश्वास ठेवले हे अमित शहांनी मान्य केलं. गेल्या १० वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. उत्पन्न वाढलं का? याऊलट शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्यांच्यावर अशी वेळ आणली हीच मोदींची गॅरंटी का असा सवाल पवारांनी विचारला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2024 1:28 PM IST