TRENDING:

Diwali 2025: यंदाची दिवाळी 20 की 21ऑक्टोबरला? जाणून घ्या वसुबारस ते भाऊबीजेपर्यंतच्या सर्व तारखा

Last Updated:

यंदा कार्तिक अमावस्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होऊन 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:54 वाजेपर्यंत चालणार आहे. लक्ष्मीपूजनाची वेळ सूर्यास्तानंतरची असल्याने, या वर्षी दिवाळीचा मुख्य सण 20 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. दिव्यांची रोषणाई, फराळाची मजा आणि आनंदाचे वातावरण यामुळे सगळेजण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहतात. दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा या सणांना खास महत्त्व असतं. यंदा म्हणजेच 2025 च्या दिवाळीत हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत आणि यंदाची दिवाळी कधी आहे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement

हिंदू पंचांगानुसार दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. यंदा कार्तिक अमावस्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होऊन 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:54 वाजेपर्यंत चालणार आहे. लक्ष्मीपूजनाची वेळ सूर्यास्तानंतरची असल्याने, या वर्षी दिवाळीचा मुख्य सण 20 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.

धनत्रयोदशी – 18 ऑक्टोबर 2025 धनत्रयोदशी हा दिवाळीतील पहिला दिवस आहे. या दिवशी मुख्यतः खरेदी करणे आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला विशेष महत्त्व आहे. घरात सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. या वर्षी खरेदीसाठी शुभ वेळ दुपारी 12:18 पासून 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पर्यंत आहे.

advertisement

नरक चतुर्दशी – 19 ऑक्टोबर 2025 त्यानंतर, नरक चतुर्दशीचा दिवस असतो.या दिवसाचं महत्त्व म्हणजे, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला. याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.

लक्ष्मीपूजन – 20 ऑक्टोबर 2025 दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन यावर्षी अमावस्या 20 ऑक्टोबरला सुरू होऊन 21 ऑक्टोबरपर्यंत आहे. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी 20 ऑक्टोबर म्हणजेच , सोमवारी साजरी केली जाईल. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:18 पर्यंत आहे.

advertisement

बालिप्रतिपदा / दिवाळी पाडवा – 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी पाडवा नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी राजा बलि यांच्या पूजा करून पाडवा साजरा केला जातो. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास मानला जातो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

भाऊबीज – 23 ऑक्टोबर 2025 दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच भाऊबीजेचा सण साजरा करतात. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचं वचन देतो

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali 2025: यंदाची दिवाळी 20 की 21ऑक्टोबरला? जाणून घ्या वसुबारस ते भाऊबीजेपर्यंतच्या सर्व तारखा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल