TRENDING:

Samruddhi Mahamarg: जीव महत्त्वाचा! पावसाळ्यात अपघाताचा धोका, ‘समृद्धी’वरून प्रवासाआधी हे लक्षात ठेवाच!

Last Updated:

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर अवघ्या 8 तासांत पार करता येते. परंतु, अपघातांचा धोका देखील वाढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख आहे. मुंबई ते नागपूर हे 700 किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे केवळ आठ तासात पार करता येते. परंतु जेवढी चर्चा या महामार्गाच्या वेगाची आहे तेवढीच चर्चा या महामार्गावर होत असलेल्या अपघातांची देखील आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये समृद्धीवर वाहन घेऊन जाण्याआधी अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? याबाबत जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement

वेगमर्यादा ओलांडू नका

समृद्धी महामार्गावर पावसाळ्यातच नव्हे तर इतर तीनही ऋतूंमध्ये चारचाकी वाहनांची गती 120 किलोमीटर प्रतितास चार निश्चित करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी 80 किमी प्रति तास एवढी निश्चित केली आहे. हे वाहनधारकांनी लक्षात घ्यावं आणि त्यापेक्षा अधिक गतीने वाहन चालवू नये, असं परविहन अधिकारी सांगतात.

Monsoon Tourism: पावसाळी पर्यटनासाठी धबधबे, गडकिल्ल्यांवर जाताय? थांबा! सरकारचा निर्णय पाहूनच करा प्लॅन

advertisement

200 मीटरचा हेड डिस्टन्स ठेवा

पावसाळ्यामध्ये वाहन चालवत असताना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा किमान 20 किमी वेगमर्यादा कमी ठेवावी. जेणेकरून आपल्याला आलेल्या अडथळ्याला प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळेल. पण वाहनधारकांनी किमान 200 मीटरचा हेड डिस्टन्स ठेवावा. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्ता आणि टायर मधील घर्षणही कमी झालेले असतं. त्यामुळे ब्रेक दाबल्यानंतरही वाहन लवकर नियंत्रणात येत नाही. त्याचबरोबर इतर वाहनांमुळे आपल्या वाहनाच्या काचेवर पाणी येऊन अडथळा निर्माण होऊ शकतो. अशावेळी वेग जास्त असल्यास प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी होऊन पुढील वाहनाला धडकून अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

advertisement

टायरची गुणवत्ता तपासा

समृद्धी महामार्गावर वाहन प्रवेश करण्यापूर्वीच आपल्या वाहनाची बसवलेल्या टायरची गुणवत्ता तपासावी. टायरची लाईफ संपलेली असेल तर किंवा बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असेल तर अशी वाहने समृद्धी महामार्गावर प्रवेशच करू नये. त्याचबरोबर लांबचा प्रवास असेल तर दर दोन तासांनी ब्रेक घ्यावा. वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने बाजूच्या व्यक्तीशी सतत संवाद करावा जेणेकरून वाहन चालवणारा वाहन चालक सतत चेतना स्थितीत राहील, असेही चंद्रमोहन चिंतल सांगतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकारची काळजी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना घेतली तर आपण नक्कीच समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालू शकतो, असं जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: जीव महत्त्वाचा! पावसाळ्यात अपघाताचा धोका, ‘समृद्धी’वरून प्रवासाआधी हे लक्षात ठेवाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल