Monsoon Tourism: पावसाळी पर्यटनासाठी धबधबे, गडकिल्ल्यांवर जाताय? थांबा! सरकारचा निर्णय पाहूनच करा प्लॅन
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Monsoon Tourism: पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता धबधबे, धरणे आणि गडकिल्ल्यांवर प्रवेश संख्या निश्चित केली जाणार आहे.
पुणे: सध्या मान्सूनचा काळ सुरू असून निसर्ग खुलून दिसतोय. अशा निसर्गरम्य वातावरणात पावसाळी पर्यटनासाठी अनेकजण बाहेर पडतात. धबधबे, धरणे आणि गडकिल्ल्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. अशा गर्दीच्या काळात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. वनविभाग आणि पर्यटनस्थळावरील स्थानिक अधिकारी आता संबंधित पर्यटन ठिकाणची प्रवेशसंख्या निश्चित करणार आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डड्डी यांनी सूचना दिल्या आहेत.
पुण्यातील कुंडमेळा पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डड्डी यांनी यापूर्वीच पर्यटन धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेवरून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला वन विभागाचे उप वनसंरक्षक आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
advertisement
पर्यटकांची संख्या निश्चित केली जाणार
पावसाळी पर्यटनासाठी धबधबा, धरणे आणि गडकिल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. ते टाळण्यासाठी एकावेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यावा? याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार प्रवेशसंख्या निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पर्यटनस्थळानुसार वन विभागाचे अधिकारी तेथील प्रवेश मर्यादा निश्चित करतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
advertisement
शुल्क आकारणी होणार
पर्यटनस्थळांवर प्रवेश संख्या निश्चित करण्याबरोबरच आता ठराविक शुल्कही आकारले जाणार आहे. पर्यटकांनी किती अंतरापर्यंत जावे याची देखील क्षेत्र निश्चिती होणार असून पर्यटकांना सुरक्षित उभे राहण्यासाठी देखील जागा तयार केली जाणार आहे. त्यासाठी बॅरिकेट्स लावले जातील.
पर्यटक मित्र नेमणार
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचे सुरक्षा रक्षक तयार राहतील. मात्र, वनविभागाकडे सुरक्षा रक्षकांची कमी असल्याने काही स्थानिक नागरिकांना देखील पर्यटकमित्र म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. या पर्यटकमित्रांना पर्यटन शुल्कातून मानधन दिले जाईल, असेही जिल्हाधिकारी डड्डी यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 09, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/Travel/
Monsoon Tourism: पावसाळी पर्यटनासाठी धबधबे, गडकिल्ल्यांवर जाताय? थांबा! सरकारचा निर्णय पाहूनच करा प्लॅन