याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ई-बाइक टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबई शहरापासून होणार आहे. त्यानंतर त्याची सर्व ठिकाणी अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सरकारी नियमांनुसार 12 वर्षांवरील सर्व प्रवासी ई-टॅक्सीमधून प्रवास करू शकतील.
Metro 2B: मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका होणार सुरू! कुठून ते कुठपर्यंत धावणार?
advertisement
किती असेल भाडं?
ई-बाइक टॅक्सीचा वापर करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी शासनाने भाड्याचे दर निश्चित केले आहेत. चालकांना त्यानुसारच प्रवाशांकडून भाडे आकारणी करावी लागेल. ई-बाइक टॅक्सीची भाडे आकारणी दोन टप्प्यांत आधारित आहे. पहिल्या टप्प्यात प्रति 1.5 किलोमीटर अंतरासाठी प्रवाशांना 15 रुपये भाडं द्यावे लागेल तर त्यापुढील प्रवासासाठी प्रति किलोमीटर 10.27 रुपये मोजावे लागतील. भाड्याचे दर प्रत्येक शहरात समान असतील की नाही याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.
ई-बाइक टॅक्सी सेवेमुळे प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषणावर पूर्णपणे आळा बसेल आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. शिवाय ई-बाइक टॅक्सीमुळे प्रवाशांना कमी वेळेत इच्छित स्थळी पोहचता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण देखील कमी होईल.
पार्टिशन आवश्यक
ई-बाइक टॅक्सीवरून प्रवास करताना एकावेळी दोन जण म्हणजे चालक आणि त्यामागे एकच प्रवासी असेल. प्रवासी महिला असल्यास त्यासाठी संबंधित वाहनावर पार्टिशन बंधनकारक असणार आहे. त्यामुळे चालकांना पार्टिशनची व्यवस्था करावी लागणार आहे.