Metro 2B: मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका होणार सुरू! कुठून ते कुठपर्यंत धावणार?

Last Updated:

Metro 2B: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीनं (एमएमआरडीए) 'मेट्रो2 ब' या मार्गिकेचं काम सुरू आहे.

Metro 2B: मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका होणार सुरू! कुठून ते कुठपर्यंत धावणार?
Metro 2B: मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका होणार सुरू! कुठून ते कुठपर्यंत धावणार?
मुंबई: मुंबईमध्ये मेट्रोचा अतिशय वेगाने विकास करण्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीन (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो2 ब या मार्गिकेचं काम सुरू आहे. या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा लवकरच सेवेत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 22 किलोमीटर लांबीच्या आणि 22 स्टेशन्सचा समावेश असलेल्या 'मेट्रो 3 ब' या मार्गिकेचं काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करत आहे. मंडाले ते डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन ते मंडाले, असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. दिल्लीतील मेट्रो रेल्वे सुरक्षेच्या (सीएमआरएस) मेट्रो आयुक्तांच्या पथकाकडून काही दिवसांपासून चाचण्या देखील सुरू होत्या. आता मेट्रो आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानंतर या मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल.
advertisement
येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मंडाले ते डायमंड गार्डन मेट्रो सुरू झाल्यास मुंबईतील वाहतूक सेवेत दाखल होणारी ही पाचवी मार्गिका ठरणार आहे. याबाबत एमएमआरडीएकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
advertisement
दरम्यान, येत्या 30 सप्टेंबर रोजी कुलाबा ते वांद्रे-सीप्झ ते आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील शेवटच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता हा मुहूर्त पुढे गेला असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. याच वेळी मेट्रो 2 ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचंही लोकार्पण होईल अशी चर्चा आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Metro 2B: मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका होणार सुरू! कुठून ते कुठपर्यंत धावणार?
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement