Mumbai Metro: मेट्रोसाठी राज्य सरकारची तिजोरी पुन्हा उघडली! मुंबई-ठाण्याला दिले 462 कोटी
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे परिसरात मेट्रोचं जाळं विकसित करण्यावर भर दिला आहे.
मुंबई: महानगरी मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहराच्या वाढत्या प्रवासीसंख्येचा भार एकट्या लोकलला सहन होत नसल्याचं चित्र आहे. प्रत्येक लोकलमध्ये खचाखच गर्दी भरलेली असते. याला पर्याय म्हणून सध्या मेट्रोच्या विस्ताराला प्राधान्य दिलं जात आहे. त्यासाठी राज्यसरकार मुक्तहस्ताने निधी देखील मंजूर करत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी 462 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर (गुरुवारी) रोजी हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी आणि नागरिकांना आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे परिसरात मेट्रोचे जाळं विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 350 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांची निर्मिती केली जात आहे.
advertisement
केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प बांधले जात आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यातील काही प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तर काही मेट्रो मार्गांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
advertisement
कोणत्या प्रकल्पांसाठी किती निधी
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गासाठी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन सुमारे 37 हजार 275 कोटी रुपये खर्च करत आहे. लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शिल्लक राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 80 कोटी रुपये दिले आहेत.
ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रोसाठी - 32 कोटी 50 लाख रुपये
स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-6साठी - 50 कोटी रुपये
advertisement
दहिसर पूर्व ते डीएननगर मेट्रोसाठी - 37 कोटी 50 लाख रुपये
कल्याण-तळोजा मेट्रोसाठी - 10 कोटी रुपये
डीएन नगर ते मंडाले मेट्रोसाठी - 73 कोटी 50 लाख रुपये
ठाण्यातील गायमुख ते मिरा रोडमधील शिवाजी चौका दरम्याना 9 किलोमीटर लांबीच्या मेट्रो
मार्गासाठी - 10 कोटी रुपये
कासारवडवली-गायमुख मार्गासाठी - 100 कोटी रुपये
advertisement
अंधेरी-दहिसर पूर्व मार्गासाठी - 37 कोटी 50 लाख रुपये
अंधेरी ते विमानतळ मेट्रोसाठी - 30 कोटी रुपये
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 9:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Metro: मेट्रोसाठी राज्य सरकारची तिजोरी पुन्हा उघडली! मुंबई-ठाण्याला दिले 462 कोटी