Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, कोकणातील 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज ठाणे, मुंबईसह सर्व 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
ठाणे आणि नवी मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज नवी मुंबईत वाशी, नेरुळ, बेलापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दिवसभर पावसाचा जोर कायम राहील. ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाचा जोर आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सततच्या सरी सुरू राहतील. काही भागांत मुसळधार पावसामुळे रस्ते आणि गल्ल्यांमध्ये पाणी साचू शकते. वाऱ्याचा वेगही मध्यम ते जास्त राहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगडमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी भूस्खलनाचा धोका आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.