बिस्किट खाल्ल्याने मुलांच्या शरीरात काय होतं, त्यांना बिस्कीट का देऊ नये? याची कारणं सांगलीच्या डॉक्टर मुग्धा तगारे यांनी सांगितले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.
कितीही प्रेम असलं तरी मामाची मुलगी, आत्याच्या मुलाशी लग्न नको; साताऱ्याच्या डॉक्टरांनी भयंकर परिणाम
advertisement
डॉ. मुग्धा तगारे यांनी सांगितलं की, बिस्किटमध्ये मैदा असतो जो पचायला जड असतो आणि शरीरासाठी अनावश्यक असतो. तसंच यात आर्टिफिशिअल स्टॅबिलायझर वापरलेले असतात ते शरीरासाठी हानिकारक असतात. बिस्किट खाल्ल्याने बद्धकोष्ठता वाढू शकते. त्यामुळे शौचाला होत नाही, खडे होतात अशा समस्या असलेल्या मुलांना बिस्कीट बिलकुल देऊ नये. काही बिस्किटांमध्ये चॉकलेटसारखे पदार्थ टाकलेले असतात ज्यामुळे मुलांना ती पुन्हा पुन्हा खावीशी वाटतात आणि मुलं जेवत नाहीत. पोळी, भाजी, वरण-भात हा आहार घेत नाहीत. बिस्कीटं खाऊनच त्यांचं पोट भरतं.
मुलांना सुरुवातीपासूनच बिस्किटं देऊ नका, बिस्किटं खायची सवय त्यांना लावू नका, किंबहुना बिस्किटं घरी आणूच नका, असा सल्ला डॉ. तगारे यांनी पालकांना दिला आहे.
दररोज फक्त बिस्कीट खात होता मुलगा, अचानक मृत्यू
इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये राहणारा हा सात वर्षांचा मुलगा. ज्याचं नाव अल्फी अँथनी निकोल्स असं होतं. तो ऑटिझमनं ग्रस्त होता. सुरुवातीच्या काळात त्याचा आहार चांगला होता, पण शाळेत गेल्यावर तो फक्त काही बिस्किटं खात खायचा आणि थोडं पाणी प्यायचा. सतत बिस्कीट खाण्याची सवय त्याला लागली. अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या पालकांना त्याची समस्या लक्षात आली नाही असं नाही. त्याची आई ल्युसी मॅरिसन त्याला अनेकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती, कारण तिला काहीतरी चुकीचं वाटत होतं. पण डॉक्टरांना त्याच्या समस्येचं निदान करता आलं नाही. डॉक्टरांनाही ते समजलं नाही. हे सर्व ऑटिझममुळे होत असल्याचं त्यांनी ल्युसीला सांगितलं.
पण त्याच्या मृत्यूनंतर खरं कारण उघड झालंं. त्याला Avoidant/Restrictive Food Intake Disorder (ARFID) होता, जो ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये असामान्य नाही, परंतु डॉक्टर अजूनही पकडू शकत नाहीत. अल्फी गंभीर कुपोषित होता, डॉक्टरांना ते समजलं नाही. यासाठी रुग्णालयाने अल्फीच्या कुटुंबीयांची माफीही मागितली होती.
या प्रकरणात, न्यायालयाच्या लक्षात आलं की शाळेच्या नर्सनं अल्फीला कधीही पाहिलं नाही किंवा तो किती किंवा काय खात आहे हे समजून घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात अल्फीला फूड क्लिनिकमध्ये स्पीच आणि लँग्वेज टिमकडे पाठवलं होतं, परंतु त्यावेळी फक्त शरीरातील पाण्याच्या पातळीची तपासणी झाली. त्याची झोप आणि इतर कामात मदत मिळाली पण त्याच्या जेवणाकडे लक्ष दिलं नाही. त्याचं वजनही बरोबर नव्हतं. यानंतर त्याचं वजन कमी होत गेलं. अल्फीच्या आईचं म्हणणं आहे की तिनं याबद्दल अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकलं नाही.
