कितीही प्रेम असलं तरी मामाची मुलगी, आत्याच्या मुलाशी लग्न नको; साताऱ्याच्या डॉक्टरांनी भयंकर परिणाम

Last Updated:

Marriage in blood relation : मामाची मुलगी आणि आत्याच्या मुलाशी लग्न करू नये, असं सांगितलं जातं. तेव्हा त्या मुलाला आणि मुलीला असे सांगणारे प्रेमाचे दुश्मन वाटतात. अगदी त्यांच्या लग्नाला विरोध करणारं कुटुंबही त्यांच्यासाठी शत्रू बनतं. पण डॉक्टरांनी याचे परिणाम सांगितले आहेत.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : लग्न झालं की नवरी मुलाला तिची नणंद दारात अडवते आणि तेव्हाच तिच्याकडे माझ्या मुलाला तुझी मुलगी देशील असं वचन घेते. कित्येक लग्नात तुम्ही हे पाहिलं असेल. मामाची मुलगी आणि आत्याच्या मुलगा असं लग्न बहुतेक ठिकाणी सामान्य आहे. पण डॉक्टरांनी मात्र नात्यात लग्न करू नका, असा सल्ला दिला आहे. साताऱ्याच्या डॉक्टरांनी याचे भयंकर परिणाम सांगितले आहेत.
मामाची मुलगी आणि आत्याच्या मुलाशी लग्न करू नये, असं सांगितलं जातं. तेव्हा त्या मुलाला आणि मुलीला असे सांगणारे प्रेमाचे दुश्मन वाटतात. अगदी त्यांच्या लग्नाला विरोध करणारं कुटुंबही त्यांच्यासाठी शत्रू बनतं. काय होतंय? असं आपल्याला वाटतं. पण डॉक्टरही हे योग्य असल्याचं सांगतात. यामागील नेमकं कारण काय, नात्यात लग्न केल्याने काय होतं? हे सातऱ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
साताऱ्याच्या डॉ. प्रियांका साळुंखे यांनी सांगितलं, नात्यात लग्न का करू नये, याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जेनेटिक डिसॉर्डर, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्यासाठी नात्यात लग्न टाळलं जातं. नात्यात लग्न म्हणजे जेनेटिकचं रिपिटेशन.
advertisement
नात्यात लग्न केल्याने होतात 'दिव्यांग' मुलं?
ब्रिटनमधील कट्टरपंथी कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन यांनी याआधी एक व्हिडिओ शेअर करून दावा केला आहे की, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी समुदायामध्ये चुलत भावंडांमधील विवाहाचे प्रमाण खूपच जास्त आहे आणि यामुळेच त्यालोकांमध्ये जन्मजात दोष (Birth Defect) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
रॉबिन्सन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 3% इतका असलेला पाकिस्तानी समाज आहे आणि त्यात 33% मुलांमध्ये जन्मदोष आढला आहे. त्यांनी दावा केला की, या समाजातील तब्बल 76% लोक फर्स्ट कझिन म्हणजेच चुलत भावंडांशीच लग्न करतात.
advertisement
त्यांच्या या वक्तव्यानंतर ब्रिटनमध्ये फर्स्ट कझिन मॅरेजबाबत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. काही लोक रॉबिन्सन यांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही लोक याला इस्लामोफोबिया आणि सामाजिक विद्वेष मानत आहेत.
वैज्ञानिक काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते, फर्स्ट कझिन मॅरेजमुळे होणाऱ्या संततीमध्ये आनुवंशिक आजार होण्याचा धोका सामान्य लग्नांपेक्षा दुपटीने जास्त असतो. कारण जरी रक्तगट वेगळा असला, तरी आनुवंशिक रचना (Genetic structure) फारशी वेगळी नसते. परिणामी थॅलेसीमिया, मायक्रोसेफली, डॉमिनंट किंवा रिसेसिव जेनेटिक डिसऑर्डर अशा अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.
advertisement
जगात कुठे सर्वाधिक फर्स्ट कझिन मॅरेज?
जगभरात अनेक देशांमध्ये फर्स्ट कझिन मॅरेज केल्या जातात, विशेषतः इस्लामिक देशांमध्ये ही प्रथा अधिक आहे. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सुमारे 61.2% कझिन मॅरेज होतात. त्यानंतर कुवैत (54.3%), कतार, यूएई, अफगाणिस्तान, सुदान यांसारख्या देशांचा क्रम लागतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कितीही प्रेम असलं तरी मामाची मुलगी, आत्याच्या मुलाशी लग्न नको; साताऱ्याच्या डॉक्टरांनी भयंकर परिणाम
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement