साकीब नाचनच्या अटकेनंतर कारवाईला वेग
काही दिवसांपूर्वी साकीब नाचन याला एटीएसने अटक केल्यानंतर या कारवाईला अधिक वेग आला आहे. साकीब नाचन हा भिवंडी जवळील बोरीवली गावचा रहिवासी होता. एटीएसने केलेल्या तपासानुसार, साकीब हा स्लिपर सेल बनवण्यात आणि तरुणांची माथी भडकवण्यात पटाईत होता.
‘अल शाम’ नावाचा स्वतंत्र देश
मिळालेल्या माहितीनुसार, साकीब नाचन याने बोरीवली हे गाव 'वेगळा देश' म्हणून घोषित केला होता. या गावाला त्याने ‘अल शाम’ असं नाव दिलं होतं. इतकेच नव्हे, तर या 'अल शाम'साठी साकीबने स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र मंत्रीमंडळ देखील तयार केलं होतं.
advertisement
दहशतवादी कारवायांच्या आर्थिक स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी ED या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे, तर ATS दहशतवादी कृत्यांशी आणि स्लिपर सेल निर्मितीशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या धाडीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
