सध्या संपूर्ण मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. त्यातल्या त्यात एरवी मुंबईसह उपनगरात प्रचंड वाहतुक कोंडी असते. त्यात सणासुदीलाही अशीच वाहतुक कोंडी राहिली तर गणेशभक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हा मनस्ताप टाळण्यासाठी भिवंडीतील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी आज वाहतुक कोंडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आपल्या गाडीतून निघाले होते. मात्र काही अंतरावर पोहोचताच त्यांच्यावर वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली होती.
advertisement
भिवंडीतील हॉलिमेरी स्कूलमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिसांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी आमदार शांताराम मोरे आपल्या गाडीतून निघाले होते. पण त्यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसला.त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे आमदार शांताराम मोरे यांच्यावर पायी बैठकीला पोहोचण्याची वेळ आली. या दरम्यान नागरीकांनी आमदाराचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
दरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना विध्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. 2 ते 3 किलोमीटरचा प्रवासांसाठी तासंतास प्रवास करावा लागत होता.त्यामुळे नागरीक मेटाकुटीला आले आहेत. आता गणेशोत्सवात देखील रस्त्यावर भीषण परिस्थिती असणार आहे.त्यामुळे जर वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला नाही तर बाप्पांच्या आगमना दरम्यान आणि विसर्जना दरम्यान गणेश भक्तांना प्रचंड त्रास होणार आहे.
