अण्णा हजारे यांचं म्युझियम....
अण्णा हजारे यांनी तक्रार केल्यानंतर पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदे यांनी अडचण सांगितली. मंत्रीमहोदय एकनाथ शिंदे बोलतायेत, असं म्हणत मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन दिला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाई यांना आदेश सोडले. मी राळेगणसिद्घी इथं आलोय. राळेगण इथं आपल्या अण्णा हजारे यांचं एक म्युझियम तयार करण्यात आलंय. म्युझियम आहे इथं, फक्त त्याला थोडं डेव्हलपमेंट करायचंय. त्याला थोडे पैसे देऊन करून घ्यावं लागेल. अधिकाऱ्यांना कामाला लावा आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही देखील इथं येऊन अण्णांचा आशीर्वाद घ्या, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
advertisement
अधिकाऱ्यांना सांगून काम करून घ्या...
एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांना महत्त्व पटवून दिलं. म्युझियमला चांगले तयार करण्याची गरज आहे. खूप लोकं इथं येतात. पर्यटकांचा रेकॉर्ड देखील चांगला आहे. अधिकाऱ्यांना सांगून काम करून घ्या, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी शंभूराजे देसाईंना दिला. तसेच अण्णा हजारे यांना म्युझियमबद्दल आश्वासन देखील दिलं. याचा व्हिडीओ मंगेश चिवटे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा Video
अजित पवार यांच्यावर टीका
दरम्यान, राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात आले असून, जलसंधारण क्षेत्रात अण्णा हजारेंचे कार्य आदर्श असल्याचंही शिंदेंनी गौरविले. अण्णा हजारे यांनी जलसंधारणाच्या दोन्ही बाजूंनी बांबू लागवड करण्याची मागणी यावेळी केली. देशासाठी अण्णा हजारे यांनी केलेलं कार्य विसरणं अशक्य असल्याचं शिंदेंनी म्हटलं. एकीकडे शिंदेंच्या दौऱ्यानंतर अण्णा हजारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अण्णांनी थेट संस्कार काढल्याचं पहायला मिळालं.
