TRENDING:

'..तो मैं खुद की भी नहीं सुनता', जामखेडमध्ये एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांना इशारा

Last Updated:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. एक बार जो मैंने कमीटमेंट कर दी, फीर मैं खुद की भी नही सुनता, अशा शब्दांत शिंदे यांनी रोहित पवारांसह भाजपचे आमदार राम शिंदे यांना इशारा दिला आहे. कर्जत जामखेडमध्ये विकास हवा असेल तर शिवसेनेला मत द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. ते जामखेड दौऱ्यात केलेल्या भाषणात बोलत होते.
News18
News18
advertisement

ही लढाई जामखेड शहराचा विकास खुंटवणाऱ्या प्रस्थापितांविरोधात आहे. लोकांनी एकत्र यावं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेडमध्ये सांगितले. जामखेड हे अजूनही खेड्यासारखेच आहे. विकास करायचा असेल तर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. माझ्याकडे नगरविकास आणि पाणीपुरवठा दोन्ही खाती आहेत. त्यामुळे हमखास विकास होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी 'एक बार जो मैंने कमीटमेंट कर दी, फीर मैं खुद की भी नही सुनता' अशी डायलॉगबाजी करत रोहित पवारांना आणि राम शिंदेंना इशारा दिला. तसेच त्यांनी कर्जत जामखेडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

यावेळी एकनाथ शिंदेंनी आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. जामखेडला दोन आमदार आहेत. पण कामे होत नाहीत. दोघे एकमेकांची कामे अडवतात. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, असा थेट आरोप शिंदेंनी केला. ते जामखेड येथे नगरपरिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी शिंदे आले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या टीकेमुळे जामखेडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'..तो मैं खुद की भी नहीं सुनता', जामखेडमध्ये एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांना इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल