TRENDING:

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''

Last Updated:

Eknath Shinde On Alliance With MIM: एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

advertisement
पुणे: अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदही एमआयएममुळे चांगलीच चर्चेत आली आहे. बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे. एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
advertisement

परळीत काय घडलं?

परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -16 , शिवसेना शिंदे गट - 2,एमआय एम - 1,अपक्ष - 4 अशा 24 जणांचा समावेश आहे. या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश असून उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे सेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे

advertisement

भाजपचा गट स्वतंत्र एककीडे अजित पवार गट आणि शिंदे सेना यांनी एमआयएमला सोबत घेऊन गट स्थापन केला असताना, भारतीय जनता पक्षाने (BJP) मात्र यापासून अंतर राखत आपला स्वतंत्र गट कायम ठेवला आहे.

विरोधकांनी शिंदे गटाला घेरलं...

एमआयएमसोबत युती केल्याने देशभरात भाजपच्या निर्णयावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटानेही केलेल्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी शिंदे गटाला घेरताना आता कुठं हिंदुत्व असा सवाल केला आहे. शिवसेना शिंदे गटाने एमआयएमसोबत केलेली युती ही राज्यात चर्चेची विषय ठरली आहे.

advertisement

एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

पुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. परळीतील राजकीय घडामोडीवर विचारले असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. शिंदे यांनी कोण एमआयएम असा उलट सवाल करत अधिक भाष्य करणे टाळले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल