राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी सूप वाजले. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबरनंतर केव्हाही होऊ शकते, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता येत्या २४ तासांमध्ये महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद...
advertisement
राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची चिन्हे आहेत. तर, आरक्षणाच्या मुद्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावर विलंबाने होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन टप्प्यात ही जाहीर केली जाऊ शकते. ५० टक्के आरक्षण न ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा डबल बार उडणार?
जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महापालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मात्र, २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती.
