आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी धाराशिव 2.0 यासह तीन फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवर कलम 223, 337, 353 ,66(ड) नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदानाआधी किंवा मतदान सुरू असताना एक्झिट पोल दाखवू नये, असा नियम आहे. मात्र नियमाला हरताळ फासून काहींनी एक्झिट पोल दाखवला होता.
सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येईल, एक्झिट पोल दाखवणं महागात
advertisement
सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आले होते. धाराशिव 2.0, जिल्हा धाराशिव, ऑल अबाउट धाराशिव यासह अनेक अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडून तिघांना दणका
संबंधित एक्झिट पोलवर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. आक्षेप तक्रारीनंतर बारा दिवसांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅडमिनला अटक करणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
मतदाना अगोदरच टीव्ही चॅनेल तसेच समाज माध्यमांवर एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तक्रार देऊनही बारा दिवसांपासून प्रशासन गुन्हा दाखल करत नसल्याने विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती.
