समोर आलेल्या माहितीनुसार, क्रेनच्या साहाय्याने विहिरीतील मोटार काढत असताना विजेचा धक्का लागल्याने शेतकरी कुटुंबातील बाप-लेकासह शेतातील मजूर आणि क्रेन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दुर्घटनेतील सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत आहेत.
कुटुंबीयांचा आक्रोश
advertisement
दरम्यान, या दुर्घटनेत कासिम फुलारी (54 वर्ष) रतन कासिम फुलारी (16 वर्ष), रामलिंग साखरे (30 वर्ष) नागनाथ साखरे (वय 53) वर्ष या चौघा जणांचा मृत्यू झाला आहेय रामलिंग साखरे यांच्यासह त्यांचे वडिल नागनाथ साखरे याही बापलेकााच दु्र्दैवी अंत झाला. दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
केशेगाव परिसरात शोककळा
चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि इतर शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नळदृग पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी घटनेचा पंचनामा करत तपास करत आहेत. घटनेने केशेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
एकाच क्षणात कुटुंबाची वाताहत
या घटनेने शेती करताना वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या पद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेने प्रशासनावर आणि शेतीमधील सुरक्षिततेच्या नियमांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. एकाच क्षणात कुटुंबाची झालेली ही वाताहत पाहून संपूर्ण गाव हळहळले आहे.
