हत्ती तहानेनं व्याकूळ असावा बहुतेक अशी कुजबुज गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. गावकऱ्यांना वाटलं हत्ती मागे फिरून पुन्हा जंगलात जाईल पण कसलं काय हत्ती तर गावात शिरला. त्याने पिंप टाकून दिलं आणि तो गावात घुसला. त्याने रस्त्यात आलेल्या बाईकचं मोठं नुकसान केलं.
हत्तीनं बाईकची इतकी वाईट अवस्था केली की बस्स. आपल्या सोंडेनं आणि पायाने बाईकची सीट काढून टाकली. पुढचा भाग गाडीपासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला. गाडीची मोडतोड करुन झाल्यावर हत्ती पुन्हा रस्त्याने चालू लागला.
बेळगाव जवळच्या बीके कंग्राळी या गावांमध्ये आज सकाळी जंगली हत्ती आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्ती घुसल्याची माहिती ग्रामस्थांनी तातडीनं पोलीस आणि वनविभागाला दिली.
वन विभागाने हा हत्ती शहरात जाऊ नये, इथूनच जंगलात परतावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. साधारण दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर हत्तीला जंगलाच्या दिशेनं पाठवण्यात यश आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये हत्तीबद्दल चांगलीच धास्ती बसली आहे. हत्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.