TRENDING:

Swayam Siddha Yojana : महिलांनो स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा का? सरकार देतंय 10 लाखांची मदत, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Last Updated:

Government scheme : महिलांनो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आता सोपी झाली आहे. राज्य सरकारतर्फे महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये कर्ज मिळू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक सक्षमीकरण देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला स्वयंसिद्धी योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील गरीब महिलांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण 5 लाख ते 10 लाख रुपये कर्ज मिळू शकते. कर्जासाठी व्याजदर 12 टक्के निश्चित करण्यात आले असून, कर्ज घेणाऱ्या महिलांना हा व्याज परतावा सुलभ पद्धतीने दिला जातो. योजना महिला आदिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित केंद्रांच्या माध्यमातून राबविली जाते.
News18
News18
advertisement

विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक व्यवसायांमध्ये कर्जाची संधी उपलब्ध आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, फळे आणि भाजीपाला, अॅल्युमिनियम फैब्रिक शॉप, ऑटो स्पेअर पार्ट्स, टेलरिंग युनिट, हार्डवेअर तसेच पेंट शॉप, लाकडी वस्तू बनवणे, वीटभट्टी, ग्लास आणि फोटोफ्रेम सेंटर यांसारखे व्यवसाय आहेत. या व्यवसायांसाठी कर्ज घेऊन महिलांना रोजगार निर्माण करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची संधी मिळते.

advertisement

योजनेसाठी पात्रता आणि अटी कोणते?

अर्जदार महिला राज्यातील रहिवासी असावी आणि तिचे वय किमा 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे. अर्जदार गरीब रेषेखालील किंवा मध्यम उत्पन्न गटातील असणे आवश्यक आहे. तसेच, जर महिला अनुसूचित जाती, जमाती किंवा मागासवर्गीय गटातील असेल तर तिला प्राधान्य दिले जाते.

अर्ज प्रक्रिया कशी करावी?

महिलांनी आपल्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर मुख्य किंवा उपकंपनी अंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा. तसेच, काही प्रकरणांमध्ये ऑफलाइन अर्ज करणे देखील शक्य आहे.

advertisement

आवश्यक कागदपत्रे कोणती?

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर ओळखीचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाची पडताळणी करणारे कागदपत्र, मागासवर्गीय प्रमाणपत्र, बँकेकडून कर्ज मंजुरीचे पत्र, कर्जाची रक्कम दर्शविणारे दस्तऐवज तसेच बचत गटाची सर्व संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे.

व्यवसायासाठी मिळणा सहाय्य आणि प्रशिक्षण:

सध्या रोजगार मिळवणे कठीण झाल्यामुळे महिलांना व्यवसायासाठी सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी योजनेचा प्रचार करणे, महिलांसाठी ठिकठिकाणी शिबिरे घेणे, हेल्पडेस्क सुरू करणे, ग्रामीण भागात बचतगट उभारणे आणि प्रशिक्षण देणे यासारखी उपाययोजना केली जात आहे. यामुळे महिलांना आर्थिक मदत आणि व्यवसायिक मार्गदर्शन मिळेल.

advertisement

व्याजदर परतावा:

महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना ओबीसी महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो, तर बचत गटातील उर्वरित महिलांसाठी महामंडळ व इतर शासकीय विभाग योजनेंतर्गत लाभ पुरवतात. महिला स्वयंसिद्धी योजना ही आर्थिक स्वतंत्रता देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देते, ज्यामुळे समाजात महिला सक्षमीकरणाचा मार्ग अधिक बळकट होतो.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Swayam Siddha Yojana : महिलांनो स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा का? सरकार देतंय 10 लाखांची मदत, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल