होळी जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे तळीराम मंडळी नियोजनाच्या गडबडीत असतानाा ड्राय डे नसणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे, गांधी जयंतीला ड्राय डे हा शंभर टक्के असतो, पण या दिवशीही ड्राय डे नसणार आहे, आता महाराष्ट्रात दारू विक्रीला परवानगी आहे, अशी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. पण, अखेरीस महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने असा कोणताही निर्णय घेतला नाही, असं स्पष्ट केलं आाहे.
advertisement
"महाराष्ट्रात आता होळी, मोहरम आणि गांधी जयंती या दिवशी ड्राय डे पाळले जाणार नसल्याबाबतची
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे खोटी आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात ड्राय डे कधी असतो?
महाराष्ट्रामध्येच काय तर संपूर्ण देशामध्ये ड्राय डेचे दिवस हे ठरलेले असतात. महाराष्ट्राचा विचार केलाा तर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात कलम १४२ नुसार निर्णय घेण्याचा अधिकार आहे. होळीच्या दिवशी ड्राय डे नसतो. त्याासह वर्षभरात ८ दिवस ड्राय डे हे ठरलेले असतात. यामध्ये १५ ऑगस्ट, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी बलिदान दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, आषाढी एकादशी, 15 ऑगस्ट, अनंत चतुर्थी, 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीच्याा दिवशी देशभरात ड्राय डे असतो. तसंच राज्यात कार्तिकी एकादशीच्या दिवशीही ड्राय डे जााहीर असतो. या दिवशी कुठेही दारू विक्री करण्यास सक्त मनाई असते.
