'काय सांगशील ज्ञानदा...' गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाच्या ओळखीचं आणि लक्ष वेधून घेणारं वाक्य आणि त्यानंतर समोरून बातमीची खडान खडा माहिती देणारी ज्ञानदा कदम. हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून जुळलं. अलीकडे तर तसं सोशल मीडियावर ज्ञानदाचा ट्रेंडच होता. पहिल्यांदाच मराठी न्यूज इंडस्ट्रीमध्ये एखाद्या महिला स्टार अँकरच्या बाबतीत असा ट्रेंड सोशल मीडियावर पाहण्यास मिळाला होता. मागील काही दिवसांपासून ज्ञानदा कुठे जाणार अशी चर्चा रंगली होती. पण त्यालाही कारण तसंच होतं.
advertisement
गेली 17 वर्ष एका वृत्तसंस्थेत काम केल्यानंतर ज्ञानदाने काळाची पावलं ओळखत 'स्क्रिन' बदलण्याचा निर्णय घेतला. आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचलेलं निर्भीड, अचूक बातम्या आणि सामाजिक जाण बाळगणाऱ्या न्यूज18 लोकमत वृत्तवाहिनीतून ज्ञानदा ही आपली सेकंड इनिंग सुरू करत आहे.
ज्ञानदाबद्दल सांगायचं झालं तर तिचे मूळ कुटुंब कणकवली, सिंधुदुर्ग येथील आहे. ज्ञानदाचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या गांधी बालमंदिर हायस्कूल इथं झालं. मुंबईच्या व्ही .जी. वझे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. तिने व्हॉइस कल्चरवर कोर्स पूर्ण केला. त्यानंतर तिने एका वृत्तवाहिनीत मुख्य वृत्तनिवेदिका अर्थात न्यूज अँकर म्हणून कामाला सुरुवात केली. अँकरिंगसह तिने फिल्डवरही रिपोर्टिंग उत्तमरित्या काम केलं आणि करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदा आणि बातम्या हे समीकरण बनलंय. आता हेच समीकरण आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात तुमच्या लाडक्या न्यूज 18 लोकमतवर ऐकायला आणि पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे काय सांगशील नव्हे तर ज्ञानदाच आता इथं सगळं सांगणार आहे, त्यामुळे पाहत राहा न्यूज18 लोकमत...