पितृपक्षामध्ये विविध प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत. पूजा अर्चा शुभ कार्य बंद असल्याने फुलांना पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे बाजारामध्ये फुलांना अत्यंत कमी म्हणजे पाच रुपये किलो पर्यंत दर मिळत आहे. तर विक्री न झालेली फुले बाजारामध्येच फेकून देऊन शेतकऱ्यांना तसंच माघारी परतावं लागत आहे. गणेशोत्सवामध्ये फुलांना 40 ते 50 रुपये प्रति किलो असा दर होता तर गुलाब देखील 100 ते 150 रुपये प्रति किलो पर्यंत विक्री व्हायचं. त्यामुळे फुलांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु शेतकऱ्यांच्या आशेवर पितृपक्षाने पाणी फिरले.
advertisement
फुलांच्या पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळाल आहे. माझ्याकडे शेतामध्ये दोन एकर फुल आहेत. त्यामध्ये एक एकर झेंडू अर्धा एकर गुलाब तर अर्धा एकर मोगरा आहे. काल मी 30 ते 40 किलो झेंडू आणला होता तो इथे फेकून दिला आहे. गुलछडीला दहा ते पंधरा रुपये किलो एवढा दर आहे. गुलाब ला दहा ते पंधरा रुपये दर आहे. मोगऱ्याला देखील 100 पन्नास रुपये असा दर मिळतोय. शेती प्रत्येक जण आशेने करतो आपल्याला दर मिळेल अशी अपेक्षा असते परंतु शेती प्रत्येक वेळी तोट्यात जातीये. माझे एम एस सी बी एड शिक्षण झाले तरी देखील शेती करावी लागते आणि शेतीमधूनही काहीही उरत नाही असे एका उच्चशिक्षित तरुणाने सांगितलं.