TRENDING:

सुवासिनीच्या कार्यक्रमात आवडीने पुरणपोळ्या खाल्ल्या; पण काहीच वेळात 30 जण पोहोचले रुग्णालयात, काय घडलं?

Last Updated:

कळंब तालुक्यातील परतापुर गावात एका परिवाराकडून सुवासिनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी जेवून आल्यावर तीन तासांनीच अनेकांना त्रास सुरू झाला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव : पुरणपोळी हा महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे. मात्र, आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त नागरिकांना पुरणपोळी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीन दिवस अगोदर कळंब तालुक्यातील परतापुर गावात एका परिवाराकडून सुवासिनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी जेवून आल्यावर तीन तासांनीच अनेकांना त्रास सुरू झाला आणि नागरिकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले.
30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा (प्रतिकात्मक फोटो)
30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

उपचार घेऊन. त्रास कमी होत नसल्याने नागरिकांनी शासकीय रुग्णालयात प्रथम उपचार घेतले आणि त्या ठिकाणाहून सर्वांना 8 फेब्रुवारी रोजी स्थानांतर करण्यात आलं आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी साडेपाच वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उपचारासाठी परतापुर येथील 30 नागरिकांना दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 4 महिला अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

advertisement

इथं वडापावसाठी लागतात रांगा, रोज होतेय 4 हजारांवर विक्री, पुण्यातील ठिकाण माहितीये का?

30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली असून यामध्ये काहींनी प्राथमिक उपचार घेतले आणि त्यांना आराम मिळाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून पुरुषांना देखील विषबाधा झाली होती. मात्र त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्याने त्यांना आराम मिळाल्याची माहिती रुगणांसोबत आलेल्या नातेवाईकांनी दिली आहे.

advertisement

या घटनेची माहिती मिळताच धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आहे. तसंच योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांनी रुग्णांची विचारपूस करून रुग्णांना घाबरून न जाण्याचा दिलासा दिला आहे.

advertisement

सर्वांना विषबाधा कशामुळे झाली हे पाहण्यासाठी सर्वांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. गावातील नागरिकांनी खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. त्या ठिकाणी चुकीचे उपचार झाले का? असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुवासिनीच्या कार्यक्रमात आवडीने पुरणपोळ्या खाल्ल्या; पण काहीच वेळात 30 जण पोहोचले रुग्णालयात, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल