इथं वडापावसाठी लागतात रांगा, रोज होतेय 4 हजारांवर विक्री, पुण्यातील ठिकाण माहितीये का?

Last Updated:

कधीकाळी 20 पैशांना असणारा वडापाव आता 23 रुपयांना झाला असून परदेशातूनही मागणी असते.

+
इथं

इथं वडापावसाठी लागतात रांगा, रोज होतेय 4 हजारांवर विक्री, पुण्यातील ठिकाण माहितीये का?

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात स्ट्रीट फूडमध्ये सर्वात आवडता पदार्थ म्हटलं की वडापाव होय. प्रत्येक शहरातील वडापावची एक वेगळी खासियत असते. तसेच प्रत्येक शहरात वडापावसाठी प्रसिद्ध असणारी काही ठिकाणं असतात. पुण्यातील कँप परिसरात गार्डन वडापाव हे असंच प्रसिद्ध ठिकाण आहे. 1972 मध्ये सुरू झालेला हा वडापावचा स्टॉल भलताच लोकप्रिय आहे. अक्षरश: वडापावसाठी रांगेत उभं राहावं लागतं. येथाल खास चवीमुळं दिवसाला 4 हजारांहून अधिक वडापावची विक्री होते, असं मालक अक्षय नायकू सांगतात.
advertisement
कशी झाली सुरुवात?
लक्ष्मण काशिनाथ नायडू यांनी 1972 मध्ये एक उत्पनाचा स्रोत म्हणून हातगाडीवर व्यवसाय सुरु केला होता. त्या वेळेस ते भजी, वडे असं विकत होते. म्हणजे तेव्हा अगदी 20 पैशाला वडापाव विकायचे. आज तोच वडापाव 23 रुपयेला मिळतो. क्वालिटी आणि चव ही सुरुवातीपासून कायम आहे. अगदी चटणी देखील माझी आजी बनवत होती तशीच आहे. त्यामुळेच या वडापावसाठी मोठी गर्दी जमते, असं मालक अक्षय नायकू सांगतात.
advertisement
दिवसाला 4 हजार वडापावची विक्री
आता गार्डन वडापावच्या तीन शाखा आहेत. वडापाव खाण्यासाठी खूप लांबून लोक येतात. येथील पार्सल अगदी परदेशातही जातं. दुबई, फ्रान्स, सिंगापूर अशा विविध देशात देखील लोकांचा आवडता वडापाव पोहोचतो, अशी माहिती अक्षय नायकू देतात. येथील वडापावसोबत मिळणारी चटणीही तितकीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसाला 4 हजार वडापावची विक्री होते. त्यामुळेच फक्त पुणेकरच नाही तर फॉरेनर देखील हा वडापाव खाण्यासाठीच येत असतात.
मराठी बातम्या/Food/
इथं वडापावसाठी लागतात रांगा, रोज होतेय 4 हजारांवर विक्री, पुण्यातील ठिकाण माहितीये का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement