advertisement

जगातील 5 सर्वात शक्तिशाली देश कोणते? भारताने राखला दबदबा, पण पाकिस्तानची स्थिती दयनीय

Last Updated:

दरवर्षीप्रमाणे यंदाचाही 'ग्लोबल फायरपावर इंडेक्स 2026 (Global Firepower Index 2026) जाहीर झाला आहे. या अहवालात जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी लावण्यात आली असून काही धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत.

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : जगभरात सध्या ज्या प्रकारे अस्थिरतेचं वातावरण आहे, ते पाहता प्रत्येक देश आपली लष्करी ताकद वाढवण्यावर भर देत आहे. ज्याचं सैन्य प्रबळ, त्याचा जगात वचक, हे समीकरण आजच्या काळात पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. संरक्षण बजेट असो किंवा अत्याधुनिक शस्त्रं, जगातील महासत्तांमध्ये सध्या एक अघोषित स्पर्धा सुरू आहे.
अशातच, दरवर्षीप्रमाणे यंदाचाही 'ग्लोबल फायरपावर इंडेक्स 2026 (Global Firepower Index 2026) जाहीर झाला आहे. या अहवालात जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी लावण्यात आली असून काही धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, भारताने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, तर शेजारील देश पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या यादीत कोणता देश कितव्या क्रमांकावर आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1. अमेरिका: अजूनही जगात 'नंबर 1'
लष्करी ताकदीच्या बाबतीत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) ने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. अमेरिकेचा पावर इंडेक्स स्कोर 0.0741 इतका आहे. प्रचंड संरक्षण बजेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अण्वस्त्र आणि जगभर पसरलेलं लष्करी जाळं यामुळे अमेरिका इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे. जगातील अनेक देशांच्या एकूण बजेटपेक्षा जास्त खर्च अमेरिका एकट्या संरक्षणावर करते.
advertisement
2. रशिया: युद्धाच्या सावटातही स्थान टिकवून
युक्रेनसोबतच्या प्रदीर्घ संघर्षानंतरही रशियाने जगात आपला दुसरा क्रमांक टिकवून ठेवला आहे. रशियाचा स्कोर 0.0791 आहे. स्कोअरमध्ये किंचित घट झाली असली, तरी रशियाची अण्वस्त्र क्षमता आणि जमिनीवरील लष्करी ताकद अजूनही जगाला धडकी भरवणारी आहे.
3. चीन: नौदल आणि सायबर शक्तीत वाढ
चीन 0.0919 स्कोअरसह तिसऱ्या स्थानावर आहे. चीन सध्या आपल्या नौदलाचा (Navy) विस्तार करण्यावर आणि 'सायबर वॉरफेअर' तंत्रज्ञानावर प्रचंड गुंतवणूक करत आहे. भविष्यातील युद्धांमध्ये चीन हे सर्वात मोठे लष्करी आव्हान असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
4. भारत: जगासाठी 'सुपरपावर' होण्याच्या दिशेने
भारतासाठी 2026 चा हा अहवाल अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. भारताने जगात चौथा क्रमांक पटकावून आपली लष्करी झेप कायम राखली आहे. 2025 मध्ये भारताचा स्कोअर 0.1184 होता, जो 2026 मध्ये सुधारून 0.1446 झाला आहे. लष्करी मनुष्यबळ, स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि हिंदी महासागरातील वाढता प्रभाव यामुळे भारताची ताकद वाढली आहे.
advertisement
5. पाकिस्तानची घसरण: आर्थिक संकट नडले?
भारताचा शेजारी देश पाकिस्तानसाठी 2026 हे वर्ष लष्करी दृष्टीने धोक्याची घंटा वाजवणारे ठरले आहे. पाकिस्तानच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानमधील डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि नवीन लष्करी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक न करू शकणं, ही या घसरणीची मुख्य कारणे आहेत.
हा इंडेक्स कसा ठरवला जातो?
ग्लोबल फायरपावर इंडेक्स 2005 पासून जगातील लष्करी शक्तीचे मूल्यमापन करत आहे. ही रँकिंग ठरवण्यासाठी 60 हून अधिक घटकांचा विचार केला जातो, ज्यात प्रामुख्याने:
advertisement
-लष्करी बजेट आणि सैनिकांची संख्या.
-टँक, लढाऊ विमाने आणि नौदलाची जहाजे.
-अण्वस्त्र क्षमता आणि लॉजिस्टिक सपोर्ट.
-भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक प्रगती.
यांसारख्या गोष्टींचा विचार केला जातो.
2026 ची ही आकडेवारी पाहता, भारत आपली लष्करी ताकद केवळ टिकवून नाही तर ती अधिक मजबूत करत आहे. आशिया खंडात चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी भारताची ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
जगातील 5 सर्वात शक्तिशाली देश कोणते? भारताने राखला दबदबा, पण पाकिस्तानची स्थिती दयनीय
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement